माणुसकीचा खेळ...

ऐकताय ना आज ना विरहित प्रसंग घडला हो अचानक आज बातमी कळाली कि आपल्या जवळचा माणूस आज विश्व सोडून गेला। काय जणू नियतीला थांबवणारे आपण कोण ? आज चालता बोलता माणसाचे अस्तित्व संपून जातंय। मोहमाया जणू घरटे विणून आकर्षणाचा खेळ मांडून आपल्या अस्तित्वाला नुसता कलंक लावतेय। तो मनुष्य जागेपणी अख्या विश्वाला सोडून गेला।क्षणभंगुर आयुष्याला पाजर फुटण्या इतपत आपण योग्य आहोत का हो  ?  दुख,प्रेंम ,माया ,आवड,रुची त्यांचे एकमेकांना काहीच वाटत नाही का ? आपल्या परीने ह्या विषयासोबत  संथ वाहत जातात आणि मनुष्याच्या जाणीवा उफाळून त्यांना पालवी फुटते आणि मग त्यांचे दुधात विष कोलसवल्यासारखे रुपांतर होते।माणूस बाधतो म्हणजे नक्की काय हो ? तो बिगडतो कि त्याची जगण्याची उर्मी कमी होत जाते। अख्या विश्वाला सांभाळणारा एक दैवत आहे पण ह्या विश्वातील पिंडाला सांभाळणारे जणू असंख्य आहेत मग का बरे मनुष्याला दुख येत राहते। विश्वाला गवसणी घालणारा  सुद्धा एकच आहे,मग का माणूस का गुंतत चाला आहे ह्या कणखर आयुष्याला। जागेपणी मोह होतो तो कळत सुद्धा नाही.आग लावताना तिला एखाद्या पेटनार्या  वस्तूशी जोडावे लागते मग त्याचे अस्तित्व दिसते  तसच रक्ता मधली आस एकदा काय कमी झाली कि माणूस भरकटतो त्याला नको ते करावेसे वाटते मायेत दिवसेंदिवस अडकत जातो . अश्या ह्या निर्णायक अवस्थेला आपण काही काळ जवळ करू शकतो,जगण्याचा वेगवेगळ्या जाणिवा आपल्या नियम बद्ध प्रमाणात ठराविक वेळेत कार्यकारण वापरल्या जाणाऱ्या आहेत. मानवी स्वभावाला आपण संलग्न रित्या नाही ओळखू शकत,कारण रचना हि त्या नुसार च केली जाते..भावभावन ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसाला बाधत चाल्या आहेत. वेळप्रसंगी त्या बदलतात त्यना एक नवीन रूप प्रपात होते,त्या मध्ये काही जरा स बसाल झाला तरी हि तो एका नवीन गोष्टी सारखा वाटू लागतो.सध्य स्थिती पाहून त्यावर विचार करावा लागतो.जमेल तस होईल तसा तास त्यानुसार त्याला बदलावे लागते.म्हणूनच माया असणं फार वेगळे आहे आणि मायेत स्वतःहून तारून राहणे फार वेगळे आहे...







\

Comments

Post a Comment