असे हे आयुष्य म्हणे...

असे हि आयुष्य...
  आयुष्य म्हंटल कि सर्वच आलं त्यात पण आपल्याला सोयीस्कर असं आवडेल अस आयुष्य माणूस आपल्या परिने जगत असतो भले आनंद मिळो अथवा नको. परिणाम प्रत्येक मनुष्ययोनी वर चढ-उतार पद्धतीने होत राहतो आणि जाणून त्यात बदल करणे हा मोठा गुण आहे. आयुष्याला कलाटणी केव्हा कशी आणि कधी येईल ह्यात काहि विशेष सांगायला नको.आपला कमीपणा दुसऱ्यासाठी त्याचा मोठेपणा असू शकतो.
  "चढते वाढवावे भजन देवाचे" असं सर्रास म्हणतो पण माणुसकी तितकीच मोलाची आहे ह्यात सुद्धा काळानुसार बदल झालाच पाहिजे. संलग्न अश्या कोणत्याच बाजू नाहीत आपल्या आयुष्यात पण साधारणत: ह्या मार्गक्रम होत असताना आपल्या बुद्धीचा कल ह्याला नवा रस्ता दाखवतो त्यानुसार आपल्यात क्षणिक का होईना त्वरित बदल जाणवला कि जीवनात असे शांतीचे वारे वाहणार नाहीत.
   कर्माने मेला असा शब्द आपल्या वारंवार चर्चेत असतो का अस होत किंवा त्याचं कारण काय ह्याचा विचार आपल्यासारखा लोकांचा खास आवडीचा विषय असला तरी नावं ठेऊन लांब होतो,आणि पुन्हा त्यात mixup व्हायला तयार. We have to be change असं म्हूणन नाही काय साध्य होत. जाणिवा बोलून नाही तर share करून त्याचा मानसिकतेचा विचार करून वागलं पाहिजे उगाच खेळ मांडून नवी अवस्था निर्माण करून त्याला वाव मिळाला कि विषय भरकटतो.आणि ह्यांचा विषय ओघवण्याऱ्या विषय शैलीतून निर्माण होतो."बोलके आपण होतो,संवेदना मंदवतात".
    विषयाला विषय लागतो माणसाला पण माणसाचं लागतात आणि ह्याचा उपभोक्ता सर्वस्व माणूस असतो.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. समारोप खूपच भारी केलाय .👌👌👌👌specially बोलके आपण होतो संवेदना मंदावतात ❣️

    ReplyDelete

Post a Comment