भय इथले संपत नाही ...

भय म्हणजे भिती असा सर्वसाधारण समज आहे आणि भय हि संकल्पना सगळ्यांना समजून उमजून आहे. म भय कसलं हि असो आपलं किंवा लोकांच. "स्वार्थ आणि भीती ह्या दोन गोष्टीवर जग चालतय." ह्यावर शंकांच नाही. भय दारुण येत म्हणजे नक्की काय होत ह्याचा आपण कधीच विचार देखील करत नाही जेव्हा येत तेव्हा साहजिक आपण म्हणतो मला भय वाटतंय किंवा मला भीती वाटते. भयाला आतुरता नसते भय आतून आपला अंत बघत असतो.     स्वार्थ असला कि व्यक्ती आपला नसतो तर तो जगाचा पोशिंदा झाल्यासारखा feell करतो आणि भीती पोटी माणूस लाचार झालेला आपण बघतच असतो.आणि भिकारी हा भिकारी नसून आपल्या पोटाच्या खळगीला जपत असतो आणि जो स्वार्थी आहे तो खरंच भिकमग्या असतो. भय सांगून येत नसून त्याला विषयाचा मारा असतो,विषय विषारी होतात आणि मग भयाला माणूस घाबरतो.
      भयाची चर्चा आपण काय करणार;आपल्या प्रत्येक वाक्यात प्रत्येकाशी बोलण्यात भय दिसते. मला एखादी गोष्ट हवीय पण मला काहीही करता येईल आणि ती साध्य होईल ह्यातच मोठं भय आहे.क्षणिक संबंध आला कोणाचा कोणासाठीहि तरी भय हे भयानक रूप धारण करून भयावह परिस्थिती लगेच उभी करते. भयाची प्रत्येक बाजू हि काळाप्रमाणे चालत असते अस काहि गरजेच नसत. भयातीत प्रसंगाला सामोरे जाउन त्याला स्थिर स्वरूपात आपल्याकडे करून घेणे हे अवघड काम आहे.
 
   भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…
भय संगताला भयावह जाणीव देत नसतो तर आपल्या सोबत जो आहे त्याच्या परिस्थितीत आपल्याला जगायला शिकवतो आणि ह्याचा परिणाम आपल्याला नेहमी भय वाटते तेव्हा समोर येतो तो भय आपल्याकडे परावलंबित्व प्रस्थापित करतो...
   म्हणूनच प्रत्येकाला भय आहे त्याला काळ वेळ आहे त्यानुसार त्याची प्रक्रिया बदलत राहते.
निरतंर जीवनाला भयाचा आणि स्वार्थाचा अंश आहे.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. एकदम छान, विषयाची निवड अप्रतिम,����

    ReplyDelete

Post a Comment