बाप्पा चालला...

।।बाप्पा चालला रे चालला
ऐका हो ऐका बाप्पा चालला...।।

तुच माझा करता करविता
रक्षण करता सुखकर्ता...

तुझ्या भक्तीची ओढ थाटाने
अंतर्गत तुझे रूप नव्याने...

आस तुझी वाट तुझी
पाहिन मी पुढल्या वर्षी...

भेटत जा रे माझ्या मनी
स्वीकार करतो मी तुझ्या चरणी...

जड झाले माझे सकळ
आशीर्वाद दे निर्मळ...

आला तुझा दिवस
निरोप माझा कायम...

।।ओंजळ माझी लहान
दर्शन तुझे महान...।।

(नम्रता तळेकर)

Comments

Post a Comment