कविता... सवय
सवय...
लागली हि सवय आता
माझं मन झाले अधीन तुझ्या...||१||
भास झाला त्याच क्षणी
तू आलास परतोनी माझ्या मनी...||२||
झालीच सवय आता तू राहा
माझ्या निरंतर जवळी...||३||
आस लावली हि माझ्या हृदयाशी
माझी प्रीती असुदे तुझ्या कंठाशी...||४||
सर्वत्र झाला कल्लोळ सवयीचा
विसावा असुदे तुझ्या मनाला...||५||
सवयीचा गंध कधी जात नसतो
तो गुंग असतो सदोतीत...||६||
Comments
Post a Comment