'क्रिकेट प्रेमीनो' नक्की वाचा तुमच्या आमच्या मधील क्रिकेट दोस्ताला...
CRICKET TEAM & MY LIFE
PART 1st....
क्रिकेट हा शब्द खेळाचा जरी असला तरी माजा साठी तो जीव की प्राणच आहे..जन्म १९९३चा क्रिकेट समजायला आजून बराच वेळ होता त्या नंतर जसे वय वाढत गेले हळू हळू क्रिकेट सुद्धा एक बॉल आणि एक बॅट इतके समजू लागले..वर्ष होत २००० साल तेव्हा जेमतेम क्रिकेट समजू लागले मी ७ वर्षाचा होतो ,मे उन्हाला ची सुटी होती आणि मॅच होती आशिया कप ची त्या मॅच मध्ये पूर्ण आशिया कप आठवत नाही पण इंडिया आणि पाक मॅच आठवत कारण त्या मॅच बद्दल झालेली चर्च्या..आणि त्यामुळं मी पहिल्यांदा वन डे मॅच संपूर्ण पहिली आणि त्या मॅच मुळे समजले कि का क्रिकेट एवढा इंटरेस्टिंग आहे त्या नंतर मजा क्रिकेट बघण्याचा द्रीष्टीकोन च बदलला..त्या नंतर झालेली इंडिया पाक सिरींजेस ,इत्तर सिरींजेस आणि २००३ चा वर्ल्ड कप, त्या वर्ल्ड कप मध्ये इंडिया चा परफॉर्मन्स खूपच सुंदर सचिन वीरू ची ओपनिंग जोडी आणि दादा ची दादा गिरी कैफ युवी ची कडक फिल्डिंग आणि झहीर नेहराची लेफ्टी जोडी कमालच करत होते हे सगळं होऊन इंडिया ने फायनल मध्ये धडक मारली आणि फायनल होती ती त्या वेळेस ची बलाढ्य टीम ऑस्ट्रेलिया सोबत आणि त्या वेळेस अख्या जगात cricket मध्ये फक्त ऑस्ट्रेलिया चा दबदबा होता आणि त्या सोबत final खेळणं म्हणजे कठीणच रिकी पॉन्टिंग पासून ते ब्रेट ली पारीएह्त सगळेच दर्जेदार..ऑस ने 350 चा स्कोर केला एवढा मोठा चेस तेव्हा पारीएह्त कोणीच केला नव्हता...इंडिया ची बॅटिंग सुरु झाली वीरू आपल्या शैली मध्ये तडाखेबाज करत होता आणि सचिन संयमाने..मॅकग्राथ चा त्या शॉर्ट पिच बॉल ला पूल मारण्या मध्ये सचिन आऊट झाला आणि मी काय सगळी कडे शुकशुकाट कारण त्या वर्ल्ड कप ला सचिन ने 600 यत्ने रन्स केले होते...sachin नंतर वीरू तसाच खेळात राहिला परुंतु 85/86 वर खेळताना रन आऊट झाला आणि वर्ल्ड कप रन आऊट झाला...ऑस वर्ल्ड कप जिंकली ,प्रेसेंटेशन मध्ये मी एक पहिला जास्त रन्स म्हणून सचिन ला प्लेअर ऑफ टूरनामेन्ट घोषित केला पण सचिन चा चेहरा सांगत होता कि मला प्लेअर सिरींजेस नको वर्ल्ड कप हवा आहे..सचिन ते स्वप्न आणि त्या बरोबर माज सुद्धा स्वप्न तुटला एकदा तरी इंडिया चा प्लायर्स चा हातात वर्ल्ड कप बागायचं...त्या वर्ल्ड कप मध्ये मजेशीर किस्सा मणजे "रिकी पॉन्टिंग ने मारलेला वन हँडेड सिक्स ...त्या वेळेस t20 क्रिकेट नसल्याने असे shot बगायला आमाला सवय नव्हती...sagli कडे अफवा म्हणजे पॉन्टिंग चा बॅट मध्ये Spring होती.."
वर्ल्ड कप संपला इंडिया चा बाकीचा मॅच आणि ईत्तर टूरनमेन्ट मी एन्जॉय करत होतो....इंडिया टीम त्यांचा घरचा मैदान वर सुरेख खेळ करत होती परंतु बाहेर देशात जास्त करून हारच मिळत होती...सिरींजेस होती Netwest ट्रॉफी ची फायनल ती सिरींजेस म्हणजे एक प्रकारचा बदला घेणारी मॅच...कारण इंग्लंड चा प्लेअर फ्लिंटॉफ ने केलेला ते मुंबई मधला कृत्य.. आणि बदला घेन्या साठी अशी संधी नव्हती कारण इंग्लंड ला त्याचा देशात त्यांना हरवणं म्हणजे भारीच..326 चा टार्गेट चेस करताना दादा आणि वीरू ने खूप सुंदर सुरुवात करून दिले तेव्हा मला वाटले आज तर ट्रॉफी आपलीच..परंतु दादा आणि वीरू बाद झाले वर इंडिया ची मधली ऑर्डर कोसळली पुन्हा मनात तोच विचार कि आता हि पण फायनल जाते कि काय पण नवीन यंग प्लेअर युवी आणि कैफ ने मॅच खेळून काढली...परंतु युवी ची विकेट गेल्यावर कैफ ने match सांभाळून ठेवली पण मध्येच 2 विकेट आणि मॅच एकदम जवळ आता इकडून हरू नका अशी मनात धकधक...पण कैफू आणि झहीर ने त्या चोर धाव घेतल्या आणि netwest कप आपला झाला...आणि त्या नंतर दादा ने लॉर्ड्स चा गॅलरी मध्ये केला ते एकदमच सॉलिड..#बदलापूर... त्या नंतर कित्येकदा मी सुद्धा मॅच जिंकल्या नंतर दादा ची आकशन कॉपी केली...इंडिया टीम चा सगळं चांगला चाल होता परंतु इंडिया टीम ला एक ऑस्ट्रेलियन कीड लागली ती म्हणजे चॅपल ...त्याने टीम manage कमी आणि टीम मध्ये फूट पाडली ...त्यामुळं इंडिया टीम चा परफॉर्मन्स तर जातच होता पन दादा आणि त्या बरोबर इरफान पठाण आणि ईत्तर खेळाडूचं करिअर सुद्धा बरबाद केले त्या चॅपल बद्दल अजून हि मजा मनात तेवढ्याच शिव्या आणि राग आहे..
दादा ची कॅप्टनशिप संपल्या वर कुंबळे ani त्या नंतर द्रविड यांनी काही कालांतरसाठी कॅप्टनशिप केली...
वर्ल्ड कप '2007 वेस्ट इंडीस' हा वर्ल्ड कप म्हणजे मजा साठी एक खराब स्वप्न टीम इंडिया चा वर्ल्ड कप मध्येएव्हडा खराब परफॉर्म कधीच झाला नव्हता..मॅच होती बांगलादेश सोबत आणि त्या मॅच बद्दल काय बोलावं एकदम काळा दिवस इंडिया टीम साठी...ती तर mach हरलोच पण श्री लंके samor हारून आपली टीम ग्रुप मधूनच बाहेर..अजून हि आठवत कि काही लोकांनी प्लायर्सचे पुतळे जाळे होते रस्त्या वर आक्रोश करत होते.. कळत नाही मला कधी कि हा खेळ आहे हार जीत तर होतेच pan असे करणे योग्य नाही...
पुःन्हा निराशा माजा मनाला 2003 गेला 2007 गेला...
आपल्या इंडिया मध्ये एक वर्ल्ड कप हरला ki 120cr भारतीय सेलेक्टर होतात आणि कॅप्टन आणि प्लायर्स बदलण्या ची मागणी करतात जसे ह्यांना आता पाठवू selection ला..
धोनी पर्व....
2007 चा झालेल्या परफॉर्मन्स मुले इंडिया ची लोक खूपच निराश आणि दुखून गेले होते. अश्या मध्ये पुढील काही महिन्यात t 20 वर्ल्ड कप सुरु होणार होता अश्या मध्ये टीम सेलेक्टर्स ना नव टीम आणि नव कॅप्टन ची गरज होती
कारण t 20 हा फास्ट गेम होता त्यामुळे नवीन दमाचा प्लायर्स ला संधी देना योग्य होता...सचिन चा म्हण्यानुसार आणि वेंगसरकर यांचा बैठकीत dhoni ला कॅप्टन करण्याचे ठरले...धोनी म्हणजे मिडसराजा जिकडे हाथ घालो तिकडे सोन..dhoni सारख्या अन एक्सपेरीअंस कॅप्टन ने t 20 वर्ल्ड कप मध्ये धुमाकूळच घातला..धोनी आणि त्याचा यंग पठ्यानि एक एक मोठ्या संघाना हरवून फायनल गाठली
कमालच राव ज्या प्लायर्स कडे 10t 20 सामान्यच अनुभव हि नाही त्यांनी प्रथमच फायनल गाठली...आणि फायनल झालीच ती कोना सोबत तर पाकिस्तान
#अशी फायनल होणे नाही# शेवट चा ओव्हर मध्ये 12
रन्स हवे असताना dhoni ने सगळे एक्सपेरीअंस बॉलर्स बाजूला टाकून बॉल दिला तो जोगिंदर शर्मा चा हातात तेव्हा माझा मनात विचार आला अरे असा कसा हरभजण ला दिली पायजे होती...पण नाही to धोनी होता विचारा पलीकडे जाऊन विचार करणारा...आणि शेवटी काय dhoni आपल्या विचारावर खरा उतरला आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो अजून हि ते शब्द कानावर पडले मजा तर काटा येतो(and the air sreesanth takes it ) खूप बर वाटलं odi तर नाही पण t 20 वर्ल्ड कप तरी आला...पुन्हा भारतदेश इंडिया चा मॅच त्यांचं जोमाने बगु लागला...हे पाहून बरे वाटले "इंडियन क्रिकेट इस बॅक " ह्या वर्ल्ड कप मध्ये मजेदार किसा म्हणजे फायनल चा (क्लास मध्ये इंग्लिश चा पेपर असताना mi आणि माज मित्र प्रशांत राऊत आम्ही दोगांनी हा पेपर बुडवून फायनल बागायची ठरवली पण कसला काय क्लास मधुब फ़ोन ani अमी क्लास मध्ये सरांचा मार तर खालाच पण इंडिया ची इंनिंग मिस केली )
तदनंतर धोनी काही थांबला नाही सी बी सिरींजेस ऑस मध्ये 28 वर्षा नंतर जिंकलो ,2013 ची चॅम्पिअनस ट्रॉफी सुद्धा..
वर्ल्ड कप 2011...भारत...आता ह्या वर्षीचा वर्ल्ड कप भारतात होणार होता म्हणूनच एक कॉन्फिडन्स होता कि आपण जिंकू... माजा 2011 चा वर्ल्ड कप एकदम बेस्ट कारण वर्ष माझा 12 विच ..आणि अश्या मध्ये वर्ल्ड कप मॅच म्हणून रात्र भर अभ्यास करून दिवस मध्ये मॅच...असा करत करत इंडिया ने फायनल गाठली..फायनल इंडिया vs श्री लंका..लंकेचा स्कोर 275..आता आवड स्कोर चेस करायचा म्हणजे ओपनिंग चांगली झालीच पायजे..सचिन सेहवाग दोघे हि फॉर्म मध्ये..पण त्या वेळेस दोघे हि लवकर बाद झाले...अख्या स्टेडियम काय तर पूर्ण भारतात pin drop silence झाला असेल..आता नाही जमणार मला मॅच बगायला म्हणून मी माझा मित्र शिवकुमार आणि मी दोघांनी कमीत कमी 12 ओव्हर्स ची मॅच नाही पहिली..नंतर गंभीर आणि कोहली ने इंनिंग्स सावरली त्या नंतर कोहली आऊट झाल्या वर धोनी स्वतः मैदान मध्ये उतरला ज्या प्लायर्स ने पूर्ण वर्ल्ड कप मध्ये एकही 50 धाव नव्हते केल्या त्या धोनीने 91* ची इंनिंग्स खेळी केली...आणि तो शेवटचा सिक्स (dhoni finishing of in style ) अजून हि कानात मजा तसाच गुंजतो आहे...शेवटी एक स्वप्न मजा पूर्ण झाला odi चा वर्ल्ड कप घेऊन मिरवणारे आपले इंडियन प्लायर्स
"Thank you dhoni and players for such lovely memories "
2013..सचिन'स स्पेसिअल
जस जसा क्रिकेट कळू लागला होता त्या आधी सचिन ने अर्ध्या पेक्षा जास्त रेकॉर्डस् आपल्या नवा वर केले..म्हणजे मजा पेशा मोठे ani क्रिकेट जाणकारान कडून ऐकून होतो..त्या पेक्षा त्याची बॅटिंग बगुन समजला कि का ह्याला cricket चा देव बोलतात..
सचिनचा straight ड्राईव्ह आह..लाजवाबच..सचिन ने आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस् केले परंतु मला त्याची सिडनी मधली टेस्ट मॅच ची inn खुपच आवडते...त्या नंतर सचिन केले प्रथमच 200 रन्स..अजून हि आठव ते आहे कॉलेज चा lecture चालू असताना सचिन 175 वर खेळतात होता आणि ओव्हर्स hi बाकी होत्या त्यामुळे mi गपचूप स्कोर बागेत होतो ani मग काय वर्ल्ड रेकॉर्ड सचिन नाबाद 200...त्या नंतर सचिन ने 100/100 केले तेव्हा mi माटुंगा जिम खाना वर प्रॅक्टिस करत असताना आमचा माली आला आणि बोलला सचिन 90 पे खेल राहा हे अमी सर्व jan प्रॅक्टिस सोडून tv samor..sachin शंभरी झाला..
सचिन ची लास्ट ची मॅच मी वानखेडे वर होतो सचिन लास्ट इन् ला जसा आऊट झाला तसे एकदम म्हणजे स्टेडियम मध्ये शुकशुकाट...
2013 सचिन ते रिटायरमेंट स्पीच मनाला टोचून गेला...ग्रेट सचिन पाजी..thank you!!
त्या नंतर मग इंडिया ला 2015 wc आणि 2016चा t20 वर्ल्ड कप मध्ये पराभव पत्करावा लागला..असो
कोहली माय आयडॉल...
ह्या प्लेअर ला पहिल्यांदा 2008 चा त्याचा u 19 चा wc मध्ये पहिला..तेव्हा फायनल ची मॅच बगुन वाटलं इस बंदें मे दम हे!! तो जोश जिगर मस्त..पूढे 2009 ला debut ला आणि tyq नंतर कहि मॅच फ्लॉप गेल्या.pan C B सिरींजेस ची ती मॅच ज्याने मी ह्याचा फॅनच झालो..नाबाद 133..दर्जेदार इन्, त्या नंतर कोहली ने कधीच मागे वळून पहिला नाही..आशिया कप मध्ये पाक बरोबर 183,ऑस्ट्रलिया मध्ये एक टेस्ट टूर मध्ये 4 100,तसेच स्पेसिअल इन् vs पाकिस्तान t20 मध्ये 50 रन्स,ऑस्ट्रेलिया सोबत t 20 मध्ये नाबाद 83..आणि अश्या खूप इंनिंग्स ज्याने मला हाच माजा आयडॉल होण्यात भाग पाडले ..."कोहली आणि कव्हर ड्राईव्हस वाह्ह "
कोहली सुद्धा आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस् करत आहे..आणि आपल्या बॅटींग चा दम वर अनेक मॅच जिंकवून देत आहे..thanks Virat..and all the best
तसेच असे इंडिया चे खूप प्लेयर्स दम दाखवत आहे रोहित सारख प्लेअर ज्याचा नावावर 3 200 रन्स चा रेकॉर्ड आहे तो सुद्धा आपल्या तडाखेबाज फलंदाजी खास आहे..
टीम इंडिया चा आता परियन्त पाहिलेला सर्वात भारी बॉलिंग अटॅक आहे...जी कामगिरी त्यांनी ऑस्ट्रेलिया मध्ये 2018 ला टेस्ट मध्ये केली ..#sledge and body attack आज परियन्त एवढ्या टेस्ट झाले पण ती काही खासच कारण पूर्ण ऑस्ट्रेलिया टीम ला त्यांचा देशात मी बॅकफूट वर पाहिल...त्याचा प्रमाणे सौथ आफ्रिका मध्ये हि 1st odi सिरीयस जिंकलो , इंग्लंड मध्ये 1st त20 सिरीस जिंकलो ..
वर्ल्ड कप 2019 इंग्लन्ड...हा वर्ल्डकप जरी इंग्लंड मध्ये होता तरी ह्याचा प्रबळ दावेदार indiaच होती...लीग मॅचेस जिंकून इंडिया ने दाखवून दिला होता कि का इंडिया सरस आहे जिंकायला...परंतु शेवटी नशिबाची गोष्ट न्यूझीलँड आणि इंडिया चा सेमी मध्ये पाऊसच व्यत्यय आणि सामना दुसऱ्या दिवशी..240 चा टोटल चेस करतांना भारता चे प्रमुख 3 फलंदाज 10 रन्स वर आऊट..तरी जड्डू ने खिंड लढवून ठेवली होती ...नंतर dhoni रन आऊट ani इंडिया wc चा बाहेर....
असे किती तरी सामने इंडिया चे एन्जॉय केले आणि किती तरी सामने मध्ये दुःख हि झाला... टीम इंडिया जिंकु किंवा हरू.. आपण नेहमीच टीम सोबत
इंडियन cricket चिरायू हो..!!!!!
Thank You!!
@Rohan Talekar
Superb
ReplyDeleteSolid lihala aahes Rohan. Nemhich indian cricket team barobar aapli India jinko kinva haro .
ReplyDelete